logo-final-small.jpg

DIGITAL E BROCHURE

Build Your Brand’s Voice

व्यावसायिक बंधू-भगिनींनो

आपल्या बिझनेसचे डिजिटल ई ब्रोशर आहे का?

केवळ एका लिंकमध्ये आपल्या बिझनेसची सर्व माहिती जगासमोर प्रोफेशनल पद्धतीने सादर करण्यासाठी

आपले मॉडर्न, माहितीने परिपूर्ण डिजिटल ई-ब्रोशर तयार करा ...

फक्त 1450 990 रुपयांत!

प्रथम काही डिजिटल ई-ब्रोशर्स पाहा.

डिजिटल ई-ब्रोशरच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची/ उपक्रमांची माहिती तुम्ही किती नेमकेपणे आणि प्रभावीपणे जगाला सांगू शकता याचा अनुभव घेण्यासाठी खालील डिजिटल ई-ब्रोशर्स पाहा. तुमच्यासारख्याच खऱ्या-खुऱ्या व्यावसायिकांसाठी आम्ही ही डिजिटल ई-ब्रोशर्स डिझाईन केलेली आहेत. फक्त 1450 990 रुपयात तुमचेही असेच डिजिटल ई-ब्रोशर तुम्ही तयार करू शकता आणि त्याची लिंक आत्मविश्वासाने व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल माय बिझनेस, ईमेल अशा कोणत्याही ऑनलाईन माध्यमात शेअर करू शकता. तसेच तुमच्या प्रिंटेड व्हिजिटिंग कार्ड वर छापू शकता. 

ArchMax 3D
Online Classes

Arundhati’s Classes
Coaching Classes

Green Thumb
NGO

S Art Industry
Decorative Articles 

Nisarg Wari
Environment Activity

डिजिटल ई-ब्रोशर कशासाठी?

online-marketing

आजच्या ऑनलाईन शेअरिंगच्या युगात प्रिंटेड ब्रोशर्स / प्रिंटेड फ्लायर्स जवळपास कालबाह्य झाले आहेत. आता बिझनेसची सर्व माहिती ऑनलाईन देण्यासाठी बिझनेस वेबसाईट्सचा वापर केला जातो. मात्र स्वतःची वेबसाईट करून घेण्यासाठी कमीतकमी बारा ते पंधरा हजार रुपये खर्च करावे लागतात. दरवर्षी वेब सर्व्हिसेस रिन्यूअलसाठीही पुन्हा हजारो रुपये खर्च करावे लागतात.  बिझनेसची माहिती ऑनलाईन देण्यासाठी एवढा खर्च करणे सर्वच व्यावसायीकांना शक्य नसते. यामुळे आपल्या व्यवसायाची माहिती इतरांसोबत शेअर करण्यासाठी लघु आणि नव-व्यावसायिकांना नाईलाजाने व्हाट्सअप मेसेजेसचा आधार घ्यावा लागतो. व्हाट्सअप मेसेजमध्ये टेक्स्ट, फोटोज, व्हिडीओज यांच्यासाठी वेगवेगळे अनेक मेसेजेस पाठवावे लागतात. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात व्यवसायाचे चित्र विस्कळीत स्वरूपात तयार होते. आपला व्यवसाय आपण अद्याप पुरेश्या गांभीर्याने करत नाही हेही यातून नकळत सूचित होते. याचा विपरीत परिणाम व्यवसाय आणि व्यावसायिक यांच्या प्रतिमेवर होतो. हे टाळण्यासाठी…

आपला व्यवसाय, उपक्रम कोणताही असला तरी त्याचे 'इम्प्रेसिव्ह ऑनलाईन प्रेझेंटेशन' करण्याचे प्रोफेशनल आणि 'कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन' म्हणजे...

डिजिटल ई-ब्रोशर

आम्ही डिझाईन केलेल्या डिजिटल ई-ब्रोशरचे फायदे

responsive-small.jpg
अत्यल्प खर्च पण बिझनेस वेबसाईटचे फीचर्स

कोणत्याही मर्यादेशिवाय बिझनेसची सर्व माहिती डिजिटल ई-ब्रोशर मध्ये देता येईल. नवीन प्रॉडक्ट्स, सर्व्हिसेस अपडेट करता येतील. तुमचे डिजिटल ई-ब्रोशर तुम्ही ईमेल, सोशल मीडिया, व्हिजिटिंग कार्ड अशा कोणत्याही माध्यमातून शेअर करू शकता.

privacy-small-hq.jpg
संपूर्ण प्रायव्हसी आणि आत्मविश्वास

तुमच्या डिजिटल ई-ब्रोशर मध्ये फक्त तीच माहिती असेल, जी तुम्हाला इतरांना सांगायची आहे. दुसऱ्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती, इतरांचे प्रमोशन, अनावश्यक लिंक्स तिथे नसतील. यामुळे तुमचे डिजिटल ई-ब्रोशर हे फक्त तुमचे असेल जे तुम्ही कोणाही सोबत आत्मविश्वासाने शेअर करू शकाल.

business-card.jpg
डिजिटल व्हिजिटिंग कार्डचे फीचर्स

मोबाईल फोन मध्ये डिजिटल ई- ब्रोशर हे डिजिटल व्हिजिटिंग कार्डचेही काम करेल. यामध्ये फोन नंबर, व्हाट्सअप, ईमेल, एस एम एस, गुगल मॅप, सोशल मीडिया यांचे इंटिग्रेशन असेल.

agreement.jpg
सर्व कांही आमच्यावर सोपवा

तुमचे डिजिटल ई-ब्रोशर डिझाईन करणे, ते ऑनलाईन सदैव उपलब्ध असणे ही पूर्णतः आमची जबाबदारी आहे. त्यामुळे सिक्युरिटी, मेंटेनन्स, अपडेट्स यासाठी तुम्हाला काहीही करावे लागणार नाही.

'डिजिटल ई-ब्रोशर्स' अर्थात वेळ आणि पैशांची बचत.

फक्त 1450 990 रुपयांत! ऑल इन वन पॅकेज !

दिवाळीनिमित्त ऑफर मर्यादित काळासाठी

डोमेन नेम ( उदा: डॉट कॉम, डॉट इन, डॉट नेट) विकत घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 700 ते 1200 रुपये खर्च करावे लागणार नाहीत कारण तुमचे डिजिटल ई ब्रोशर आम्ही आमच्या e-brochure.in या डोमेन नेम अंतर्गत पब्लिश करणार आहोत. 

प्रोफेशनल, स्टायलिश वेबसाईट डिझाईन करण्यासाठी तुम्हाला 8,000 ते 10,000 रुपये खर्च करावे लागणार नाहीत, कारण तुमचे ‘मॉडर्न लुकिंग’ डिजिटल ई-ब्रोशर आम्ही डिझाईन करणार आहोत.   

वेब होस्टिंगसाठी दरवर्षी तुम्हाला 5,000 ते 7,000 रुपये खर्च करावे लागणार नाहीत कारण तुमचे डिजिटल ई ब्रोशर आम्ही आमच्या सर्व्हरवर पब्लिश करणार आहोत.  

लक्षात ठेवण्यास आणि शेअर करण्यास सोपी लिंक. समजा तुमच्या व्यवसायाचे नाव ‘श्री ट्रेडर्स’ असे असेल तर तुमच्या डिजिटल ई-ब्रोशरची लिंक
e-brochure.in/shree-traders अशी सुटसुटीत आणि लक्षात ठेवण्यास सोपी असेल.

FAQs

स्वतःची बिझनेस वेबसाईट पब्लिश करण्यासाठी आणि ती सुरळीत सुरु ठेवण्यासाठी प्रामुख्याने चार घटक आवश्यक असतात. १: डोमेन नेम (डॉट कॉम, डॉट इन वगैरे) २: वेब होस्टिंग सर्व्हिस ( वेबसाईट पब्लिश करण्यासाठी वेब सर्व्हर वार्षिक भाड्याने घेणे   ३: वेब डिझायनर (वेबसाईट डिझाईन करणारी व्यक्ती किंवा एजन्सी) ४: डोमेन नेम, होस्टिंग यांचे वार्षिक रिन्यूअल, वेबसाईट अपडेटस, सिक्युरिटी आणि मेंटेनन्स (डिझाईन केलेली वेबसाईट सुरक्षित ठेवणे आणि ती सुरळीत सुरु ठेवणे यासाठीची देखभाल) या चार घटकांपैकी १, २ आणि ४ साठी प्रत्येक वर्षी किमान पाच ते आठ हजार रुपये खर्च करावा लागतो. घटक क्रमांक २ साठी प्रोफेशनल वेब डिझायनर्स किमान पाच ते दहा हजार रुपये फीस आकारतात. म्हणजेच प्रोफेशनल दर्जाची बिझनेस वेबसाईट तयार करण्यासाठी किमान बारा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो. आणि ही वेबसाईट सुरळीत सुरु ठेवण्यासाठी पुढे वार्षिक पाच ते आठ हजार रुपये खर्च येतो. हे झाले स्वतःच्या बिझनेस वेबसाईटचे. बिझनेस वेबसाईट मधून जी माहिती तुम्ही देऊ शकता तीच माहिती त्याच पद्धतीने तुम्ही आमच्या डिजिटल ई ब्रोशर मध्ये देऊ शकता. पण यामध्ये सर्वात मोठा फरक हा आहे की तुम्हाला तुमचे स्वतःचे डोमेन नेम विकत घ्यावे लागत नाही, वेबसाईट होस्ट करण्यासाठी सर्व्हर भाड्याने घ्यावा लागत नाही तसेच डिझायनिंग, अपडेट्स आणि मेंटेनन्स यावर सुद्धा काही खर्च करावा लागत नाही. डिजिटल ई-ब्रोशर ही सुद्धा एक प्रकारची वेबसाइटच आहे मात्र ती तुमच्या डोमेन नेम ने आणि स्वतःच्या होस्टिंग अकाउंटवर पब्लिश केलेली नसते हा सर्वात मोठा फरक या दोघांमधला आहे. प्रोफेशनल बिझनेस वेबसाईट तयार करण्यासाठी हजारो रुपये ज्यांना खर्च करायचे नाहीत पण बिझनेस वेबसाईटचे फायदे ज्यांना अल्प किमतीमध्ये हवे आहेत त्यांच्यासाठी आमची डिजिटल ई ब्रोशर सर्व्हिस आदर्श आहे.               

तुमच्या बिझनेसचे फेसबुक आहे ही चांगलीच गोष्ट आहे. फेसबुक पेज आणि ई-ब्रोशर याना आपण एकाच गाडीची दोन चाके म्हणू शकतो. यातील एकाचा भार दुसऱ्यावर टाकता येणार नाही. फेसबुक पेजच्या माध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात राहणे त्यांना नवीन अपडेट्स देणे या बाबी चांगल्या पद्धतीने करता येतात तर ई ब्रोशरच्या माध्यमातून बिझनेसची नेमकी माहिती देता येते. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. पण ई-ब्रोशरकडून होणाऱ्या कामाची आपण फेसबुक पेज कडून अपेक्षा करू लागलो तर नुकसान होऊ शकते. कारण आजच्या ऑनलाईन युगात कमीत-कमी वेळात नेमकी आणि संगतवार माहिती समोरच्या व्यक्तीला देणे महत्वाचे आहे. आजकाल सोशल मीडियावरून आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे बहुतेक करून फेसबुक वरील माहितीकडे पहिल्या नजरेत संशयानेच पहिले जाते. फेसबुक पेज वरून नवीन संपर्कात आलेल्या व्यक्तीला तुमचे फॅन फॉलोइंग नक्कीच दिसेल पण तुमच्या बिझनेसचे स्वरूप, तुमची वाटचाल, सर्व प्रॉडक्ट्स/ सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मशन, बिझनेसचे लोकेशन एका नजरेत समजणार नाही. बिझनेसची प्रभावी प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणि विश्वास संपादन करण्यासाठी ही माहिती आवश्यक असते. अशी नेमकी माहिती न मिळाल्याने संभाव्य ग्राहक कदाचित दुसरा पर्याय शोधू शकतात. असे होऊ नये यासाठी फेसबुक पेजवरून संभाव्य ग्राहकाला वेबसाईट किंवा ई ब्रोशर वर घेऊन जाणे आवश्यक आहे. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी फेसबुक पेज पहिल्या पायरीचे काम नक्की करू शकते. पण फेसबुक पेजवर आलेल्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याला ग्राहक बनवण्यासाठी वेबसाईट अथवा ई ब्रोशरची आवश्यकता आहेच. 

तुमचे ई-ब्रोशर डिझाईन करणे, ते अपडेट करणे ही आमची जबाबदारी आहे. तुमच्या ई-ब्रोशर मधील मजकूर, फोटोज आणि इतर बाबी यांचे अपडेट्स आम्हीच करणार आहोत.  

बिजनेस वेबसाईट किंवा डिजिटल ई-ब्रोशर याना स्टॅटिक डॉक्युमेंट म्हटले जाते. सोशल मीडिया प्रमाणे डिजिटल ई-ब्रोशर्स किंवा वेबसाईट वारंवार अपडेट करण्याची आवश्यकता नसते. बिजनेसचे स्वरूप, प्रॉडक्ट्स/ सर्व्हिसेस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले तरच वेबसाईट किंवा डिजिटल डिजिटल ई-ब्रोशर अपडेट केले जाते. त्यामुळे ई-ब्रोशर सारख्या स्टॅटिक डॉक्युमेंटला वर्षातून चार अपडेट्स पुरेसे आहेत.   

तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या शब्दात, तुम्हाला जसे जमेल तसे आम्हाला द्यायची आहे. ही माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खाली गुगल फॉर्म दिला आहे. या माहितीच्या आधारे डिजिटल ई-ब्रोशरसाठी आवश्यक असलेला कन्टेन्ट आम्ही तयार करून घेऊ. 

तुमच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचे फोटोज तुम्हालाच द्यायचे आहेत पण डिजिटल ई-ब्रोशर अधिक आकर्षक बनवण्यासाठी आवश्यक इतर इमेजेस, आयकॉन्स, ग्राफिक्स आम्ही आमच्याकडील वापरू.   

डिजिटल ई-ब्रोशर डिझाईन करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला जी फीस देता ती पहिल्या एक वर्षासाठी असते. त्यानंतर पुढे ते ग्राहकाच्या आवश्यकतेप्रमाणे वारंवार अपडेट करणे, ते सदैव ऑनलाईन उपलब्ध ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. यासाठी तंत्रकुशल मनुष्यबळ, ऑनलाईन वेबसर्व्हर, त्याची सिक्युरिटी, मेंटेनन्स या बाबी आवश्यक असतात. यांचा मोठा खर्च असतो. या कारणामुळे डिजिटल ई-ब्रोशर पुढे तुम्हाला दरवर्षी रिन्यू करावे लागते. याची दरवर्षी ६९० रुपये फीस द्यावी लागेल.  

ई-ब्रोशर सर्व्हिसेस रिन्यू करण्याविषयी तुम्हाला साधारण एक महिना आधी संपर्क केला जाईल. त्या एक महिना कालावधी मध्ये पुन्हा काही वेळा आठवण करून दिली जाईल. नूतनीकरणाची तारीख उलटून गेल्यानंतर आणखी एक आठवड्याचा ‘ग्रेस पिरिअड’ तुम्हाला दिला जाईल. यानंतर मात्र तुमचे ई ब्रोशर डिलीट केले जाईल. ते ऑनलाईन दिसणार नाही.  

डिजिटल ई-ब्रोशरला व्हिजिट करणाऱ्यांना कोणतीही माहिती विचारली जात नाही. कोणालाही कसलाही फॉर्म भरावा लागत नाही किंवा कुठेही लॉग-इन करावे लागत नाही. त्यामुळे व्हिजिटर्सची वैयक्तिक माहिती, फोन नंबर, ईमेल आय डी अशा स्वरूपाचा डेटा आमच्या सर्व्हरवर सेव्ह केला जात नाही. सर्व डिजिटल ई-ब्रोशर्स ‘ओपन टू ऑल’ असतील. ज्याना तुम्ही लिंक शेअर कराल त्यांना ते सरळ कोणत्याही अडथळ्याविना पाहता येईल. 

होय, आम्ही बिझनेस वेबसाईट डिझायनिंगची सर्व्हिस देतो. कृपया संपर्क साधावा. 

तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही? लगेच व्हाट्सअप मेसेज करा आणि विचारा!

फक्त दोन स्टेप्स पूर्ण करा आणि तीन दिवसांत आपले डिजिटल ई-ब्रोशर पब्लिश करा!

डिजिटल ई-ब्रोशर तयार करण्यासाठी तुमचा कमीत कमी वेळ खर्च होईल यासाठी याचा जास्तीत जास्त भार आम्ही स्वीकारला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या व्यवसायाची आवश्यक माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस यांचे डिटेल्स त्यांचे फोटोज, युट्युब व्हिडीओजच्या लिंक्स आम्हाला द्यायच्या आहेत. ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म खाली दिला आहे. तो भरून सबमिट केला आणि 1450 990 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले की तुमची जबाबदारी संपली. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे तुमच्या डिजिटल ई ब्रोशरसाठी आम्ही कॉन्टेन्ट (लिखित मजकूर) तयार करू, तुम्ही दिलेल्या प्रॉडक्ट/ सर्व्हिसेसच्या इमेजेस आणि आमच्याकडील इमेजेस, ग्राफिक्स, आयकॉन्स वापरून तुमचे परिपूर्ण डिजिटल ई ब्रोशर पुढील तीन दिवसांत (रविवार आणि प्रमुख सुट्ट्या वगळून) पब्लिश करू. या दरम्यान व्हाट्सअप मेसेजेस द्वारे आपला संपर्क होत राहिलंच. 

Step-1

गुगल फॉर्म द्वारे आपल्या व्यवसायाची  माहिती द्या. 

गुगल फॉर्म मध्ये द्यावयाची माहिती तुम्ही मराठी किंवा इंग्रजी मध्ये तुमच्या शब्दांमध्ये देऊ शकता. आम्ही त्यावर योग्य प्रक्रिया करून घेऊ.  गुगल फॉर्म ओपन करण्यासाठी प्रथम Gmail मध्ये लॉगिन करावे लागेल.

Step-2

1450 990 रुपये ऑनलाईन पेमेंट करा. 

हे पहिल्या वर्षीचे शुल्क आहे. पुढील प्रत्येक वर्षीचे रिन्यूअल चार्जेस 690 रुपये आहेत. यामध्ये एका वर्षात चार वेळा अपडेट्स समाविष्ट आहेत. पेमेंट करण्यासाठी नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड्स, मोबाईल पेमेंट्स वापरू शकता. 

डिजटल ई ब्रोशर्स तुमच्या व्यवसायासाठी अनुरूप नाहीत?

स्वतःच्या डोमेन नेमसह बिझनेस वेबसाईट हवी आहे?

आम्ही प्रोफेशनल वेबसाईट डिझायनिंग सर्व्हिससुद्धा देतो. कृपया आजच आमच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या.  

BLOG

मराठी की इंग्लिश? गुगलचे काय म्हणणे आहे?

आमच्या विषयी

ऑनलाईन ई-ब्रोशर्सची ही अभिनव सेवा आपल्यापर्यंत पुण्यातील डिजिटल कॅनव्हास या आमच्या डिझाईन स्टुडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. डिजिटल कॅनव्हास 2004 पासून ग्राफिक डिझायनिंग, थ्री डी व्हिज्युअलायजेशन, वेब डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, प्रोफेशनल व्हिडीओ प्रॉडक्शन, ई-लर्निंग अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. अनेक भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, छोटे-मोठे व्यावसायिक, शासकीय संस्था यांच्यासाठी आम्ही सेवा देत आहोत.  विविध क्षेत्रातील ग्राहकांना डिझायनिंग सर्व्हिसेस देण्याचा प्रदीर्घ अनुभव आमच्या पाठीशी आहे. याच अनुभवाच्या बळावर आम्ही आपल्याला मॉडर्न, स्टायलिश “प्रोफेशनल ई- ब्रोशर डिझायनिंग & पब्लिशिंग’ सर्व्हिसेसची खात्री देत आहोत.

आमचे काही मान्यवर ग्राहक

● Cummins India Foundation 
● Atlas Copco
● Beck & Pollitzer
● RBI’s College of Agricultural Banking, Pune (CAB)
● Department of Agriculture, Maharashtra State
● MIT World Peace University
● Storytel

● Indian Railway’s Institute of Civil Engineering, Pune (IRICEN)
● Maharashtra State Agricultural Marketing Board 
● Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
● Public Works Dept. (PWD)
● Dr. Jagannath Dixit’s Association for Diabetes and Obesity Reversal
● Greenville Maharashtra Mandal, Greenville USA 

संपर्क

logo-final-small.jpg

DIGITAL CANVAS

506 Saptasur, DSK Vishwa, Dhayari Pune 411041